जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे भूमिपूजन

By admin | Published: January 17, 2017 04:48 AM2017-01-17T04:48:20+5:302017-01-17T04:48:20+5:30

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गुजरात क्रिकेट संघटनेचे (जीसीए) उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले.

The world's largest stadium's bhoomipujan | जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे भूमिपूजन

जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे भूमिपूजन

Next


अहमदाबाद : गुजरातमधील मोटेरा येथे होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गुजरात क्रिकेट संघटनेचे (जीसीए) उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले. या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे ७०० करोड रुपये खर्च होतील. यावेळी नाथवाणी यांनी घोषणा केली की, या स्टेडियमची निर्मिती दोन वर्षात पुर्ण होईल. जुन्या ‘सरदार पटेल गुजरात स्टेडियम’च्या जागेवर याची उभारणी होत आहे. नाथवानी यांनी यावेळी दावा केला की, ‘काम पुर्ण झाल्यानंतर हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाईल. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार असून हे स्टेडियम आॅस्टे्रलियाच्या ९० हजार प्रेक्षक क्षमतेच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला मागे टाकेल.’ (वृत्तसंस्था)

Web Title: The world's largest stadium's bhoomipujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.