द्रविड @ ४४

  • First Published :12-January-2017 : 01:17:31

  • टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा बुधवारी ४४ वर्षांचा झाला. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारताच्या १९ वर्षे आतील क्रिकेट संघ आणि भारत ए संघाचे प्रशिक्षक असलेल्या द्रविड यांनी १६४ कसोटी सामन्यात १३ हजार २८८ धावा केल्या आहेत, तर त्यात ३६ शतक झळकावले. २००३ ते २००७ दरम्यान, भारतीय संघाचे कर्णधारदेखील होते. त्यांनी ३४४ एकदिवसीय सामन्यात १० हजार ८८९ धावा केल्या. त्यात १२ शतके आणि ८३ अर्धशतके झळकावली. आयसीसीने त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक करत म्हटले की, ‘द्रविड एक महान फलंदाज आहेत. त्यांनी २४ हजार २०८ आंतरराष्ट्रीय धावा केल्या. जगभरातील फलंदाजांमध्ये हे सहावे स्थान आहे. त्यांना ४४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

    राहुलभाई वाढदिवसाच्या शुभेच्छा, सर्व उदयोन्मुख खेळाडूंसाठी तुम्ही आदर्श आहात, तसेच सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी आभार. - विराट कोहली, कर्णधार,

    टीम इंडिया सर्वाथाने नम्र व्यक्ती आणि भारतीय क्रिकेटच्या द वॉल ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला माहीत आहे का, त्यांनी दोन चेंडूत दोन गडी बाद केले होते. - विजय गोयल, केंद्रीय क्रीडामंत्री

    तो ‘व्ही’ क्षेत्रात खेळायचा. मात्र, त्याची प्रतिबद्धता, स्तर, सातत्य आणि जबाबदारी मोठी होती. गर्वाने सांगतो की, मी तुमच्यासोबत खेळलो. राहुल द्रविड आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा - वीरेंद्र सेहवाग

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma