धोनी चाहत्याने घेतली मैदानात धाव...!

  • First Published :10-January-2017 : 17:05:39 Last Updated at: 10-January-2017 : 17:10:03

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 10 - ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेला भारत ‘अ’ विरुध्द इंग्लंड सराव सामना ऐन रंगात असताना पहिल्या डावातील 46 वे षटक झाल्यानंतर नाट्य घडले.
    एकट्या कर्णधार धोनीसाठी संपुर्ण स्टेडियम भरले असताना यावेळी एका धोनी चाहत्याने सुरक्षाजाळीवरुन उडी मारुन मैदानात धाव घेतली. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या धोनी - पांड्या यांचेही लक्ष वेधले गेले. या चाहत्याने खेळपट्टीवर येताच धोनीच्या पाया पडल्या आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून मैदानाबाहेर नेले. मैदानाबाहेर नेत असताना क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र तो हीरो ठरला होता.
     
     


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS