पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शशांक कदम राज्यात प्रथम

By Admin | Published: May 21, 2015 02:09 AM2015-05-21T02:09:15+5:302015-05-21T02:09:15+5:30

पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेत सांगलीचा शशांक कदम राज्यातून प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१ सप्टेंबर, २०१४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

Shashank step in the Police Sub-Inspector examination first in the state | पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शशांक कदम राज्यात प्रथम

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शशांक कदम राज्यात प्रथम

googlenewsNext

मुंबई/ पुणे : पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेत सांगलीचा शशांक कदम राज्यातून प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१ सप्टेंबर, २०१४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. कोल्हापूरच्या वारणानगर येथे शशांक कदम याने २४६ गुण मिळविले. तर, पंढरपूरचा गणेश पाटील (२४१ गुण) व अजित बडे (२३७ गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत मागावर्गीयांमधून पालवे वस्ती येथील अजित बडे हा पहिला आला. महिलांमध्ये कोल्हापूरमधील माजागाव येथील तेजश्री पवार प्रथम आल्या. पात्र झालेल्या २६० उमेदवारांची यादी एमपीएससीने प्रसिद्ध केली आहे. २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत २०१४ च्या परीक्षेचा कट आॅफ कमी झाला आहे. पात्र उमेदवारांमध्ये खुल्या संवर्गाच्या १२४, एस.सी. संवर्गाच्या ३१, एस.टी.च्या २५, डीटीए.च्या ८, एनटीबीच्या ६, एनटीसीच्या ९, एनटीडीच्या ५ आणि ओबीसी संवर्गाच्या ५२ उमेदवारांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

एससी संवर्गात अव्वल : स्नेहल चव्हाण, अमोल जाधव, निशा श्रेयकर, पल्लवी जाधव, अपेक्षा मेश्राम, नीलम कांबळे
महिला गट खुला संवर्गातील पहिल्या तीन उमेदवारांची नावे : तेजश्री पवार, रागिनी कराळे आणि नशिपून शेख
महिला गट एन. टी. संवर्गातील अव्वल उमेदवारांची नावे : ज्योती मरकड, विद्या पवार, मयुरी तेलंग.

Web Title: Shashank step in the Police Sub-Inspector examination first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.