भूताच्या भीतीने राष्ट्रपतींनी सोडलं घर

By admin | Published: March 14, 2017 04:05 PM2017-03-14T16:05:48+5:302017-03-14T16:05:48+5:30

सिनेमांमध्ये भूताच्या भीतीमुळे घर सोडल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अशीच एक घटना ब्राझिलमध्ये घडली आहे आणि तीही चक्क येथील राष्ट्राध्यक्षांसोबत

The house of the President has left the Bhutan fear | भूताच्या भीतीने राष्ट्रपतींनी सोडलं घर

भूताच्या भीतीने राष्ट्रपतींनी सोडलं घर

Next
>
ऑनलाइन लोकमत
रिओ दि जिनेरियो, दि. 14 - सिनेमांमध्ये भूताच्या भीतीमुळे घर सोडल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अशीच एक  घटना ब्राझिलमध्ये घडली आहे आणि तीही चक्क येथील राष्ट्राध्यक्षांसोबत. भूताच्या भीतीमुळे ब्राझीलचे राष्ट्रपती मिशेल टेमेर यांनी आपल्या पत्नी मुलांसह आपलं अलिशान घर सोडलं आहे. 76 वर्षाच्या यांनी एल्वोरेडा पॅलेस हे त्यांचं शासकिय निवासस्थान सोडलं आहे. 
 
त्या घरात मला विचित्र वाटत होतं. त्या घरात राहायला गेल्याच्या पहिल्या रात्रीपासूनच मला कधी झोप लागली नाही माझ्या पत्नीलाही तेथे विचित्र वाटायचं असं सांगत मार्सेला टेमर यांनी एल्वोरेडा पॅलेस येथे वाईट आत्मांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी एका पादरीलाही येथे बोलावलं होतं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. तेथे भूत असल्याचा त्यांना संशय होता अखेर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.  
 
एल्वोरेडा पॅलेस हे जगभरात प्रसिद्ध आहे. या घराचं आर्किटेक्चर ऑस्कर नायमेयर या प्रसिद्ध आर्किटेक्चरने केलं आहे. या पॅलेसमध्ये फुटबॉलच्या मैदानापासून हॉस्पिटलपर्यंत सर्व सुविधा आहेत. या पॅलेसच्या निर्माणासाठी जवळपास 1200 कोटी रूपयांचा खर्च आल्याचं सांगितलं जातं. हे पॅलेस 7 हजार स्क्वेअर मीटरपर्यंत पसरलं आहे यावरून त्या पॅलेसची भव्यता लक्षात येते.  
 
माजी राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची पदावरून गच्छंती झाली आणि टेमेर राष्ट्रपती बनले. टेमेर यांच्या सहका-यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, तर 2014 मध्ये बेकायदेशीरपणे देणगी घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोर्टात खटलाही सुरू आहे.   
 
 
 
 

Web Title: The house of the President has left the Bhutan fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.