अॅक्शन गर्ल्स
By Admin | Published: July 30, 2015 05:09 AM2015-07-30T05:09:45+5:302015-07-30T05:09:45+5:30
बॉलीवूडमध्ये नेहमी नायकांचाच बोलबाला राहिला. त्यातही अॅक्शन चित्रपट असेल तर तो हमखास नायकालाच केंद्रस्थानी ठेवून तयार केला जायचा. परंतु मागच्या काही वर्षांत चित्र
‘दृश्यम’मधील तब्बूपाठोपाठ आणखीही नायिका रांगेत
बॉलीवूडमध्ये नेहमी नायकांचाच बोलबाला राहिला. त्यातही अॅक्शन चित्रपट असेल तर तो हमखास नायकालाच केंद्रस्थानी ठेवून तयार केला जायचा. परंतु मागच्या काही वर्षांत चित्र बदलायला लागले आहे. नवनवीन व आव्हानात्मक भूमिकांसाठीही नायिकांची निवड केली जाऊ लागली असून नायिकांनीही आपल्या अभिनय क्षमतेने ती निवड योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. निशिकांत कामथ यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. यात तब्बूने एका कठोर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठवली आहे. यानिमित्ताने बॉलीवूडच्या अॅक्शन गर्ल्सची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत तब्बूसारख्या भूमिका साकारणाऱ्या आणखी काही फेमस नायिकांचे आपल्याला पडद्यावर दर्शन घडणार आहे.
प्रियंका चोप्रा - गंगाजल-2 : डॉन, मेरी कोम यासारख्या चित्रपटातून प्रियंका चोप्रा हिने आपल्या अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘गंगाजल-2’ या सिनेमातून पुन्हा एकदा ती अॅक्शन करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर गंगाजलच्या शूटिंगचे काही सीन्स लिक झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील प्रियंका गुंडांची धुलाई करताना दिसत आहे.
दीपिका पदुकोण - बाजीराव मस्तानी
संजय लीला भन्साली दिग्दर्शित रामलीला या सिनेमात दीपिकाचा बंदूक घेऊन फिरणाऱ्या नायिकेचा बिनधास्त लूक पाहायला मिळाला होता. आता भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात दीपिका रणरागिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित बाजीराव मस्तानीमध्ये ती मस्तानीची भूमिका करीत आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन - जज्बा
‘जज्बा’ या सिनेमातून ऐश्वर्या क मबॅक करीत आहे. जज्बामध्ये तिने अनेक अॅक्शन सीन केले आहेत. यासाठी तिने खास ट्रेनिंग घेतले आहे. सिंगल मदरवर आधारित या सिनेमात ती क्रिमिनल लॉयर बनली असून अॅग्रेसिव्ह मूडमध्ये दिसणार आहे. यापूर्वी धूम-2 व जोधा-अकबर या सिनेमातही ऐश्वर्याने अॅक्शन सीन केले होते.
सोनाक्षी सिन्हा - फोर्स 2
सोनाक्षीने ‘हॉलिडे’ या सिनेमात काही साहस दृश्ये दिली होती. आगामी ‘अकीरा’ व ‘फोर्स-2’ या सिनेमात ती अॅक्शनची धमाल करताना दिसेल. अकीरा या सिनेमासाठी थायलंडच्या मार्शल आर्ट एक्स्पर्टकडून विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तर फोर्स-2 मध्ये ती रॉ एजंटची भूमिका करताना दिसेल. यातही ती अॅक्शन करताना दिसेल. यासाठी तिने बॉक्सिंगचे खास ट्रेनिंग घेतले आहे.
कतरिना कैफ - फँटम
सलमान खानच्या ‘एक था टायगर’ व ‘बँग बँग’मध्ये धासू भूमिका करणारी कतरिना या वेळी ‘फँटम’ या सिनेमातून फूल फोर्समध्ये अॅक्शन करताना दिसेल. फँटमचे पोस्टर रिलीज झाले असून यात तिचा तो लूक आकर्षणाचा विषय ठरला आहे. ‘जग्गा जासूस’ यातही ती अॅक्शन करणार आहे, यासाठी तिने ‘क्रव मागा’ची ट्रेनिंग घेतली आहे.