‘मै जेल से भाग गया हूँ’

By Admin | Published: September 19, 2014 01:00 AM2014-09-19T01:00:03+5:302014-09-19T01:00:03+5:30

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

'I have escaped from jail' | ‘मै जेल से भाग गया हूँ’

‘मै जेल से भाग गया हूँ’

googlenewsNext

पळालेल्या कैद्याने केला लोकमतला फोन
नागपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. आदल्या दिवशी तुरुंग अधिकाऱ्यांना पळून जाण्याची धमकी देऊन दुसऱ्या दिवशी भरदुपारी हा कैदी कारागृहातून पळून गेला. या घटनेने तुरुंगातील प्रशासनाचा निष्काळजीपणा जसा चव्हाट्यावर आला आहे, तसाच या कारागृहात चालणाऱ्या गैरकृत्यांनाही
उघड केले आहे.
(नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जन्मठेपेच्या कैद्याने पळून गेल्यानंतर १७ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६.४७ वाजता लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून केलेला संवाद)
कैदी : हॅलो, पत्रकार साहब बोल रहे क्या?
पत्रकार : बोलिये ऽऽऽ
कैदी : मैं क्या बोलता, मंै सूरज श्याम अरखेल बोल रहा हूँ, मंै आज साडेबाराह बजे जेल से भाग गया हूँ. क्यों की ७७७ साहब बहुत तकलीब दे रहा था. ७७७ साहबने कल रात को मेरा मोबाईल पकडा. मै उसे दो हजार रुपये हप्ता दे रहा था. दो हजार हप्ता देने के बादमे भी उसने मेरा मोबाईल पकडा. बहुत मारा, उसके साथ दो जन थे. दिलीप ७७७ और एक सुभेदार.
पत्रकार : बोलते रहिये .....(कैद्याचा पलीकडून येणारा आवाज बंद झाला. कैद्याने लगेच पत्रकाराला फोन केला)
पत्रकार : बोलो बोलो, बोलते रहो ऽऽऽ
कैदी :सहाब, मेरा मोबाईल पकडा और छीनके ले गये. ७७७ साहबको दो हजार रुपये हप्ता दे रहा था. मैन कहा, मोबाईल ले लो, पर सीम दे दो. मैने रिक्वेट किया, पर सीम दिया नही. कलच मैने बताया था की, भाग के जाऊंगा. आज साडेबाराह बजे बाहर निकला और भाग गया. बहोत परेशानी थी. ७७७ साहब बहुत माद .....है. परसो के दिन उसने बडी गोल मे रेड डाला. दस से बारह मोबाईल पकडा. पैसे वसूल किया.
पत्रकार : आप सरेंडर करोंगे क्या?
कैदी : अब कभी इस जेल मै वापस नही आऊंगा. प्रेमिका के साथ भाग रहा हूँ. अब कभी नही आता.
पत्रकार : तुम्हारे पे कौन सा आरोप है
कैदी : मंै ३०२ का आरोपी हूँ. मैं सजा काट रहा हूँ.
पत्रकार : कौनसी सजा?
कैदी : लाईफ की सजा है, बीस साल की
पत्रकार : तुम्हारा नाम क्या है?
कैदी : सूरज श्याम अरखेल.
पत्रकार : आप खामला के तरफ के हो क्या?
कैदी : नही, मैं वर्धा का रहने वाला हूँ.
(आणखी काही संवादानंतर कैद्याने फोन बंद केला)
लोकमतची भूमिका
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सूरज अरखेल या जन्मठेपेच्या कैद्याने कारागृहातून पलायन केल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला. त्याच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग लोकमतकडे उपलब्ध आहे. ही बातमी प्रसिद्ध करताना सनसनाटी निर्माण करणे आमचा हेतू नाही. या घटनेच्या निमित्ताने कारागृहातील भ्रष्टाचार, अनागोंदी, कैद्यांचे शोषण आदी गैरकृत्य जनतेसमोर आणणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी तुरुंगअधिकाऱ्याला आदल्या दिवशी पळून जाण्याची धमकी देतो आणि दुसऱ्या दिवशी यशस्वी होतो, हा एकूणच प्रकार घृणास्पद आहे. सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, कारागृहातील या गैरकृत्यांवर अंकुश घालावा, हीच लोकमतची भूमिका आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने हा फोन खरच पळून गेलेल्या कैद्याने केला का ? याबाबत पडताळणी केली असता हा फोन चंद्रपूर येथील एका कॉईन बॉक्सवरून सुरज अरखेल नाव सांगणाऱ्या व्यक्तीने केला होता, असे कॉईन बॉक्स संचालकाकडून सांगण्यात आले.

Web Title: 'I have escaped from jail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.