अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा

By admin | Published: July 5, 2017 02:12 PM2017-07-05T14:12:47+5:302017-07-05T14:12:47+5:30

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वर्षभर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली

Abortion committed by the child; VIP Security Crime | अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा

Next

 


अहमदनगर : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वर्षभर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात व्हिआयपी सुरक्षारक्षक विभागातील  कर्मचारी गणेश रामदास अकोलकर (रा़ तपोवन रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेबाबत शहरातील तपोवन रोड परिसरात राहणाºया २१ वर्षीय पीडित तरूणीने मंगळवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली़ सदर तरूणी ही शहरातील न्यू आर्ट कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेत आहे़ पोलीस मुख्यालय परिसरात राहत असलेल्या अकोलकर याच्याशी एक वर्षापूर्वी त्या तरूणीची ओळख झाली़ ओळखीचे रूपांतर पे्रमात झाले़ अकोलकर याने सदर मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वर्षभर शारीरिक संबंध ठेवले़ तरूणी गर्भवती राहिली तेव्हा शहरातील बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा गर्भपात केला़ तरूणीने अकोलकर याला माझ्याशी लग्न कर अशी मागणी केल्यानंतर त्याने नकार दिला़ या प्रकरणी तरूणीने तोफखाना परिसरात फिर्याद दाखल केली आहे़ पोलीसांनी आरोपीविरोधात महिला अत्याचार, व अ‍ॅट्रोसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे़ गुन्हा दाखल झालेला गणेश अकोलकर हा मंत्र्याच्या सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी असल्याचे समजते़ या प्रकरणाचा पुढील तपास हाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे हे करत आहेत़ आरोपीला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही़

Web Title: Abortion committed by the child; VIP Security Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.