खापर येथे शेतक:यांची साडेसात लाखांत फसवणूक

By Admin | Published: May 26, 2017 05:51 PM2017-05-26T17:51:46+5:302017-05-26T17:51:46+5:30

शेतीमाल खरेदी करीत व्यापा:याने फिरविले

Farmer at Khapar: Cheating in his seven hundred million | खापर येथे शेतक:यांची साडेसात लाखांत फसवणूक

खापर येथे शेतक:यांची साडेसात लाखांत फसवणूक

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि.26- अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील व्यापा:याने शेतीमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े व्यापा:याने शेतक:यांकडून साडेसात लाख रूपयांचा माल खरेदी केला होता़  
खापर येथील अशोक आयदान जैन या व्यापा:याने खापर व गुलीउंबर परिसरातील 15 शेतक:यांकडून मका, सोयाबीन आणि इतर धान्याची खरेदी केली होती़ 23 एप्रिल ते 25 मे या कालावधीत धान्य खरेदी करण्यात आल्यानंतर शेतक:यांना रक्कम देण्याची गरज होती़ मात्र अशोक जैन याने शेतक:यांना रक्कम न देता कच्च्या पावत्या देऊन त्यांची फिरवाफिरव केली़ शेतक:यांनी वेळोवेळी भेटी देऊनही संशयित अशोक जैन हे शेतमालाचे पैसे देत नसल्याने अखेर शुक्रवारी सायंकाळी रमेश डुमा वसावे रा़ गुलीउंबर या शेतक:याच्या फिर्यादीवरून व्यापारी अशोक जैन याच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Farmer at Khapar: Cheating in his seven hundred million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.