एस.टी.संघटनेच्या माजी अध्यक्षांना शिविगाळ

  • First Published :31-May-2014 : 00:14:44 Last Updated at: 31-May-2014 : 08:03:57

  • जळगाव- महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष आर.के.पाटील यांच्या एस.टी.अधिकारी निवासस्थान परिसरातील घरी जाऊन शिविगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एस.टी.तील लिपीक व जिल्हा प्रसिद्धी सचिव विनोद शितोडे यांच्याविरूद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद शितोडे यांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिविगाळ केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पाटील यांनी शितोळे यांचा शोध घेतला. काशिनाथ हॉटेलजवळ शितोडे दिसल्याने पाटील यांच्यासह एस.टी.च्या अन्य कर्मचार्‍यांनी शिविगाळबाबत जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गर्दी होती. एस.टी.संघटनेच्या अंतर्गत वादातून हा प्रकार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

vastushastra
aadhyatma