भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी

 • First Published :11-January-2017 : 00:02:42

 • कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणेसह परिसरातील शेतक:यांनी  रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला आदी पीक लागवडीला फाटा दिला आहे.  सद्य:स्थितीत या भागात भारनियमन सुरू आहे. परिणामी, येथील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत असून भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पांढ:या कांद्याच्या लागवडीवर शेतक:यांचा यंदा अधिक कल दिसला.

  भारनियमनाचा त्रास

  महावितरण कंपनीतर्फे कापडणेसह परिसरात आता भारनियमन सुरू झाले आहे. एका आठवडय़ात सकाळी 10 ते सायंकाळी 8 तर दुस:या आठवडय़ात संपूर्ण दिवसभर वीज बंद असते. त्यामुळे दिवसभर वीज बंद असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. कृषी पंपही बंद भारनियमनामुळे बंद असतात. त्यामुळे कापडणे भागात सुरू असलेले भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे.

  कापडणे येथील 1200 ते 1500 एकर जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते. खरीप हंगामातही येथील शेतक:यांनी मोठय़ा आशेने कांदा लागवड केली होती. परंतु, त्यांना हाती तुटपुंजे पैसे मिळाले होते. यंदा परिसरातील जयवंत यशवंत बोरसे, संभाजी रघुनाथ बोरसे, शिवाजी शंकर बोरसे, भीमराव महादू बोरसे, देवीदास गंगाराम खलाणे, अरुण पुंडलिक पाटील, अरुण परशुराम पाटील, विजय हिंमत पाटील, विश्वास आत्माराम देसले, सुरेश भीमराव बोरसे, उज्ज्वल बोरसे, नथ्थू जयराम माळी, राजेंद्र रमेश माळी, विलास आसाराम माळी यांच्यासह काही शेतक:यांनी मोठय़ा हिंमतीने पुन्हा कांदा लागवडीस प्रारंभ केला आहे.  त्यात येथील परिसरात सद्य:स्थितीत विहिरी व कूपनलिकांचे पाणी दिवसेंदिवस तळ गाठत आहे, त्यात शेतक:यांनी कांदा लागवडीचा जो निर्णय घेतला, तो किती योग्य आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे.

  पांढ:या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर

  गेल्या वर्षी रांगडा कांद्यापेक्षा सफेद कांद्याच्या उत्पादनातून येथील शेतक:यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे शेतक:यांनी पुन्हा कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

  कांदा उत्पादनातून आता चांगले उत्पादन मिळाले तर पुढे येणा:या खरीप हंगामात शेतक:यांना फायदा होणार आहे, या विचाराने शेतक:यांनी कांदा लागवड केली आहे. 

  कांद्याने रडवले होते

  गेल्या हंगामात येथील शेतक:यांनी रांगडा कांद्याची लागवड मोठय़ाप्रमाणावर केली होती. त्यासाठी सावकार, पतपेढय़ा, वि.का. सोसायटय़ा व इतर बॅँकांतून कर्ज काढले होते. परंतु, कांद्याला केवळ 5 ते 10 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळाल्याने शेतक:यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु, चाळीतील कांदाही सडून गेला. त्यामुळे शेतक:यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर यंदा शेतक:यांनी पांढ:या कांद्याची लागवड केली आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma