बर्ड फ्लूचा धोका नाही, पण काळजी घ्या!

  • First Published :11-January-2017 : 00:00:44

  • धुळे : गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव आढळल्याच्या आनुषंगाने जिल्ह्यात दक्षता बाळगत 25 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ वाय़ बी़ साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़

    गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात आणि दीव-दमण परिसरात बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली आह़े महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत हा भाग येतो़ त्यामुळे धुळे जिल्ह्यात या आजाराच्या आनुषंगाने दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत़  कारण गुजरातच्या सीमेलगत  धुळे जिल्हा येत असल्याने  पशुसंर्वधन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

    पथकाला सूचना

    जिल्ह्यातील आपापल्या गटातील प्रत्येक खासगी कुक्कुटपालन व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आजाराची साथ आहे किंवा नाही, याची खात्री करावी़ एखाद्या केंद्रावर साथीचा आजार सुरू असल्यास जास्त  प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा नाही याची खात्री करावी़ पक्ष्यांचा मृत्यू अनैसर्गिक आहे का याची खातरजमा करावी़ कुक्कुटपालन केंद्रावर अशा प्रकारच्या साथीचा आजार येऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्याचे सांगण्यात आले आह़े त्यात शेडभोवती चुना स्प्रेड करणे, शेडमध्ये कर्मचा:यांव्यतिरिक्त कोणासही प्रवेश देण्यात येऊ नये, अशा केंद्राना भेट देणा:या व्यक्तीसाठी स्वच्छ कपडय़ांची व्यवस्था करावी, कोंबडीची पिल्ले आणणे व विक्रीबाबतची नोंद ठेवणे, काही आजारांमुळे पक्षी मतरुक असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी तत्काळ संपर्क साधून मदत घेणे तसेच मृत झालेल्या पक्ष्यांची विल्हेवाट योग्य रितीने लावणे, अशा विविध बाबी यात अंतभरूत असणार आह़े संपूर्ण जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावाचे सव्रेक्षण अधिक जोमाने करून त्याचा अहवाल दर आठवडय़ास न चुकता पाठविण्यात यावा, असे आदेश पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहेत़

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma