शेलगाव आटोळ येथे वादळी वाऱ्याचे थैमान

By Admin | Published: May 28, 2017 04:23 AM2017-05-28T04:23:23+5:302017-05-28T04:23:23+5:30

पावसाच्या सरी कोसळल्या!

The storm surge at Sheelgaon Attal | शेलगाव आटोळ येथे वादळी वाऱ्याचे थैमान

शेलगाव आटोळ येथे वादळी वाऱ्याचे थैमान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यात २५ मे पासून वातावरणात बदल झाला आहे. २६ व २७ मे रोजी वादळी वार्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिक थोडे सुखावले असले, तरी वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे विद्युत पोल कोसळल्याने शेलगाव आटोळसह परिसरातील चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
सबस्टेशनची निर्मिती होऊन चार वष्रे उलटूनदेखील अपूर्ण कामांमुळे या बसस्टेशनवरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनतेला मोठा त्रास सोसावा लागत आहे. शेलगाव आटोळ परिसरात वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ ३३ केव्ही सबस्टेशनच्या मुख्य वाहिनीच्या तारा अनेक ठिकाणी तुटून पडल्या. तसेच काही विद्युत पोल कोसळल्याने, या सबस्टेशनांतर्गत येणार्या चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या भागात नेहमीच विजेची समस्या उद्भवत असल्याने जनतेच्या मागणीवरून या ३३ केव्हीच्या विद्युत सबस्टेशनची गत चार वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी चिखली ते शेलगाव आटोळपर्यंत मुख्य वाहिनीसाठी पोलदेखील उभारण्यात आले आहेत. मात्र, पोल उभारणीनंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीतच यातील अनेक पोल कोसळले होते व त्या पश्चात आता पुन्हा विद्युत पोल कोसळल्याने या भागातील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

Web Title: The storm surge at Sheelgaon Attal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.