करवसुली केल्यासच अनुदान

  • First Published :20-June-2017 : 01:07:27 Last Updated at: 20-June-2017 : 01:07:41

  •  सिन्नर : विभागीय उपसंचालकांची पालिकेला तंबीलोकमत न्यूज नेटवर्क

    सिन्नर : २०१६-१७ या आर्थिक वर्षात सिन्नर नगरपालिकेची करवसुली अवघी ५५ टक्के झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ३० जून २०१७ पर्यंत शंभर टक्के कर वसुली करा अन्यथा शहर विकासासाठी पालिकेला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न देण्याचा इशारा नाशिक विभागीय उपसंचालक कुलकर्णी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला.

    कुलकर्णी यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकारी एम. बी. खोडके यांनी घरपट्टी व पाणीपट्टी कमी प्रमाणात वसूल झाल्याबाबत सिन्नर नगरपालिका कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या काही वर्षांत सिन्नर नगरपालिकेचे करवसुलीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS