धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

By Admin | Published: March 27, 2017 09:55 PM2017-03-27T21:55:43+5:302017-03-27T21:55:43+5:30

कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे.

Runners will be going to Kavita Raut | धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

googlenewsNext



नाशिक : देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी त्याचे जाहीर सुतोवाच सोमवारी (दि.२७) नाशिकला केला.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिकची कन्या व मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याची मागणी सोमवारी नाशिकला झालेल्या आदिवासी विकास सेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. त्याला उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी ही घोषणा केली. कविता राऊत हिने नाशिक आणि महाराष्ट्राचीच शान नव्हे तर भारताचा मान वाढविला आहे. सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या कविता राऊत हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके घेतानाच आॅल्मिपिकमध्येही सहभागी होऊन नाशिकची व महाराष्ट्राची शान वाढविली आहे. त्यामुळे कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात वर्ग एक अधिकारी करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार केला असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली आहे. कविता राऊत यांना आदिवासी विकास विभागाच्या सेवेत घेतल्यास त्यापासून अनेक आदिवासी युवक-युवतींना प्रेरणा मिळणार आहे. कविता राऊत यांच्या नोकरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांच्या मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कविताला आदिवासी विकास विभागाच्या सेवेत रुजू करून घेण्यात येणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी जाहीर केले.

Web Title: Runners will be going to Kavita Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.