नगरपालिकेत नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

  • First Published :11-November-2014 : 15:50:04

  • हिंगोली : मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली. 
    प्रत्यक्षदश्रींनी सांगितल्यानुसार, हिंगोलीतील शेख युसूफ हा दुपारी मद्यप्राशन करून पालिकेत आला. आरडाओरडा केल्यानंतर त्याला कर्मचार्‍यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थेट नगराध्यक्षाच्या दालनात शिरला. तेथे कोणीही नसल्याने त्याने दालनातील काचेचा टेबल तोडला. त्यावरील रोपट्याची कुंडीही आदळली. परिणामी, दालनात खापराचे तुकडे विखुरले तर माती खाली पडली होती. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी माहिती देताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेख यास ठाण्यात घेवून गेले. तेथे बराच काळ पोलिस तक्रारीची वाट पाहात होते. त्यात आरोपींचे नातेवाईक आले अन् त्याला परत नेले. /
    रात्री उशिरा तक्रार दाखल/
    नगराध्यक्षांची कॅबीन फोडल्याची घटना घडल्यानंतर रात्री उशिरा याबाबत तक्रार देण्यात आली. त्यात शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची फिर्याद मुख्याधिकारी येलगट्टे यांनी दिली. /(प्रतिनिधी) बैठकीनंतर तक्रार देणार डेंग्यूच्या आजाराबाबत बैठक सुरू असल्याने तक्रार देता आली नाही. बैठक आटोपताच ठाण्यात तोडफोडीविरूद्ध तक्रार देणार आहे, असे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी सांगितले. तर उशिरापर्यंत तक्रारच आली नसल्याने आरोपीला नातेवाईक घेवूनही गेले असल्याची माहिती पोनि सतीश टाक यांनी दिली.

     

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma