महिला निर्भय बनण्यासाठी ‘दामिनी’ची चित्तथरारक प्रात्यक्षिके

  • First Published :08-January-2017 : 00:10:24 Last Updated at: 08-January-2017 : 00:13:36

  • जालना : ‘रेझिंग डे’निमित्ताने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान दामिनी पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून महिलांना निर्भय होण्याचा आत्मविश्वासच दिला. ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थित थक्क झाले.

    रेझिंग डे निमित्ताने शहरातील मामा चौकातून महिला सबलीकरण व सुरक्षेतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, प्राचार्या शर्मा यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी पोलीस अधीक्षक सिंह म्हणाल्या, मुली, महिलांनी अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करावा. अन्यायाविरुध्द पोलिसात नावासह अथवा निनावी तक्रार करावी. या तक्रारींची दखल घेऊन त्यांना तात्काळ मदत दिली जाईल.

    यावेळी प्राचार्या शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीतून विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षेचा संदेश दिला.

    रेझिंग डेनिमित्तच्या सप्ताहात पोलीस दलाच्या वतीने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याबरोबरच प्रशासकीय कामकाज, पोलीस दलातील विविध हत्यारांची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी पोनि. अनंत कुलकर्णी, साईनाथ ठोंबरे, पवार, भगीरथ देशमुख, सपोनि. शितलकुमार बल्लाळ, पवार, भानुदास निंभोरे, सीमा घुगे यांनी परिश्रम घेतले.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या