भाविकांची गर्दी...

  • First Published :08-January-2017 : 23:44:40 Last Updated at: 08-January-2017 : 23:47:16

  • नळदुर्ग : पौष पौर्णिमेदिनी तीर्थक्षेत्र मैलारपूर येथे होणाऱ्या श्री खंडोबारायाच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे़ व्यापारी विविध दुकाने थाटण्यात सुरूवात केली आहे़ तर रविवार भाविकांनी तीर्थक्षेत्र मैलारपूर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

    मैलारपूर येथील श्री खंडोबाची १२ जानेवारी रोजी मोठी यात्रा होणार आहे़ मंदिर व्यवस्थापन, नगरपालिकेच्या वतीने विविध यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची तयारी चालू आहे. सध्या प्रसाद, हॉटेल्स, खेळणी, हार, उद्फुल आदी विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत़ मोठे व्यापारी दुकान थाटण्याच्या तयारी आहेत. पाळणे, झोके, बाबा गाड्या, रेल्वे, मौत का कुँवा आदींचीही बांधणी चालू आहे. मंदिर व्यवस्थापनाने रंगरंगोटी, विद्युतीकरण करून मंदिर सुशोभित केले आहे. रविवारी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभर भाविकांनी मैलारपूर फुलून गेले होते़ वारू जेऊ घालणे, नैवेद्य दाखविणे, बेलभंडारा उधळणे, नवस-सायास, अन्नदान आदी विधी दिवसभरात पार पडल्या़ यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपपस्थित होते़

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma