पुण्यात भाजपाची भगवी लाट

By admin | Published: October 19, 2014 10:32 PM2014-10-19T22:32:24+5:302014-10-19T22:32:24+5:30

भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले

BJP's Bhagwati wave in Pune | पुण्यात भाजपाची भगवी लाट

पुण्यात भाजपाची भगवी लाट

Next

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन व राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका विद्यमान आमदाराला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपाच्या तिन्ही विद्यमान आमदारांनी आपली जागा मोठ्या फरकाने राखण्यात यश मिळविले.
पुण्यातील सर्वाधिक धक्कादायक पराभव विनायक निम्हण आणि रमेश बागवे यांचा मानला जात आहे. शिवाजीनगरमध्ये भाजपाचे विजय काळे यांनी निम्हण यांचा पराभव केला, तर माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी कॅन्टोन्मेंटमधून बागवे यांच्यावर मात केली. गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळालेली एकमेव वडगावशेरीची जागा टिकविता आली नाही. विद्यमान आमदार बापू पठारे यांचा भाजपाचे तरुण उमेदवार जगदीश मुळीक यांनी धक्कादायक पराभव केला. पठारे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसच्या विद्यमान आमदारांविषयी नाराजी व्यक्त होत असताना भाजपाचे कसब्याचे आमदार गिरीश बापट, पर्वतीतून माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांनी विजय मिळविला. विद्यमान आमदार चंंद्रकांत मोकाटे यांना तेथे पराभव पत्करावा लागला. हडपसरमधून योगेश टिळेकर यांनीही विजयश्री खेचून आणली. शिवसेनेचे विद्यमान आमदार महादेव बाबर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
कॉँग्रेसचेही शहरात पूर्ण पानिपत झाले. शहराध्यक्ष अभय छाजेड पर्वतीतून चौथ्या क्रमांकावर गेले. वडगावशेरीतून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांनाही चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. तर, हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. कोथरूडमधून उमेश कंधारे लढतीतही राहिले नाहीत.
शहरातून सर्वाधिक सुमारे ७० हजार मतांनी भाजपच्या माधुरी मिसाळ निवडून आल्या. भाजपाचे सरकार आल्यावर मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे बापट यांचाही सलग
पाचव्यांदा विजय झाला. त्यांनाही आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले.
इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव कॉँग्रेससाठी धक्कादायक ठरला. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भरणे विजयी झाले. जिल्ह्यातून सर्वाधिक
मतांनी विजय अजित पवार यांनी बारामतीतून मिळविला. चार महिन्यांत तीन वेळा पक्षांतर करणारे लक्ष्मण जगताप चिंचवडमधून विजयी झाले.(प्रतिनिधी)

Web Title: BJP's Bhagwati wave in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.