एमआयडीसी पोलीस स्टेशन होणार ‘स्मार्ट’

By admin | Published: June 23, 2017 11:54 AM2017-06-23T11:54:37+5:302017-06-23T11:54:37+5:30

गुन्हे पथकाची गस्तही झाली ऑनलाईन

MIDC police station to be 'smart' | एमआयडीसी पोलीस स्टेशन होणार ‘स्मार्ट’

एमआयडीसी पोलीस स्टेशन होणार ‘स्मार्ट’

Next

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.23 : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस ठाण्याच्या दैनंदिन नोंदी, व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोलीस पाटलांशी ऑनलाईन संपर्क, गुन्हे पथकाची ¨फंगर प्रिंटवरुन ऑनलाईन हजेरी, सीसीटीएनएस तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटलायङोशनकडे वाटचाल व गुन्ह्यांचा तत्काळ निपटारा, शिक्षेचे प्रमाण वाढविणे या मुद्यांच्या आधारावर एमआयडीसी पोलीस स्टेशन ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ साठी प्रस्तावित झाले आहे.   
जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील एमआयडीसी, नशिराबाद, सावदा, मेहुणबारे व अडावद या पोलीस स्टेशनची स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड झाली आहे. या पाचही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव महानिरीक्षक व महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या दोन्ही कार्यालयांकडून 5 महिने प्रत्यक्ष कामकाज तपासले जाणार आहे.  
कशामुळे मिळाले ‘आयएसओ’ ?
एमआयडीसी पोलीस स्टेशनला यापूर्वी ‘आयएसओ 9001-2015’ हे मानांकनही मिळाले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारदाराचे समाधान होण्यासाठी तत्काळ तक्रार नोंदवून ती तक्रार निकाली काढली जाते. शासकीय निधीतून 13 लाख रुपये खर्चून महिला अधिकारी व कर्मचा:यांसाठी अत्याधुनिक कक्ष तयार करण्यात आला आहे. महिला कर्मचा:यांच्या लहान बालकांसाठी स्वतंत्र सुविधा, जमा खर्चाच्या नोंदी, शस्त्रसाठा अद्ययावत ठेवणे, कॅशलेश व्यवहार, हजेरी मास्तरसाठी स्वतंत्र कक्ष, प्रलंबित गुन्ह्यांचा तत्काळ निपटारा, पोलीस पाटील यांचा व्हॉटस् अॅप ग्रुप तयार करून त्यावर ग्रामीण भागात घडणा:या घडामोडींवर लक्ष ठेवले जाते. 
संवेदनशील ठिकाणी नजर
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक संवेदनशील ठिकाण व अपघात स्थळ असल्याने अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. रेमंड चौक, काशीनाथ चौक, अजिंठा चौक, इच्छादेवी चौक, फुकटपुरा, बिसमिल्ला चौक, आदित्य चौक व अब्दुल हमीद चौक आदी ठिकाणी 36 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा नियंत्रण कक्ष इच्छादेवी चौकी व पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी उभारण्यात आला आहे.  
 
अद्ययावत अंतर्गत सुविधा 
पोलीस स्टेशनला रंगरंगोटी करण्यात आली असून बाहेरुन दोन ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आहेत. आत व बाहेर अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. भिंतीला जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कर्मचारी व तक्रारदारांसाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात इंटरकॉम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
 
कामकाजात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आता बायोमेट्रीक पध्दतीने गुन्हे पथकाची गस्तीची ऑनलाईन नोंद घेण्यात येते. त्याचे नियंत्रण थेट अपर पोलीस अधीक्षकांकडे आहे. जिल्ह्यात पहिलाच प्रयोग आमच्याकडे करण्यात आला. तक्रारी दाखल करण्यापासून तर त्या तत्काळ निकाली काढण्यावर अधिक भर देण्यात येतो.                                                           
 -सुनील कुराडे, 
पोलीस निरीक्षक, औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन

Web Title: MIDC police station to be 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.