रनर बोल भागेगा क्या?

 • First Published :15-June-2017 : 18:07:34

 • प्रसाद सांडभोर
   
   ‘हॅलो दादा, विक्र म बोलतोय... बँक एंट्रन्सला तू माझा रायटर म्हणून आला होतास - आठवलं?’
  ‘हो, हो! बोल रे विक्र म, कसा आहेस? काय चाललंय?’
  ‘मी एकदम मस्त आहे. तुझी मदत हवी होती दादा. रविवारी सकाळी फ्री असशील?’
  ‘हो! फ्री आहे मी. बोल, अजून कोणती परीक्षा देतोयस? पुन्हा रायटर हवाय?’
  ‘परीक्षा नाही. क्रि केट सिलेक्शन आहे.’
  ‘क्रि केट?’
  ‘हो, पुढच्या महिन्यात आमच्या ब्लाइंड क्रि केटच्या नॅशनल लेव्हल मॅचेस आहेत, त्यासाठी आत्ता स्टेट टीम्स ठरतायत.’
  ‘ओह ओके. अं. मग माझी काय बरं मदत... ’
  ‘मला रनर हवाय.’
  ‘रनर?’
  ‘अरे, मी टोटली ब्लाइंड आहे ना - त्यामुळे बॅटिंगला रनर मिळतो. तसा माझा नेहमीचा रनर ठरलेला आहे - फरीद. पण या रविवारी तो बाहेर चाललाय, म्हणून तुला विचारतोय. माझा रनर बनशील?’
  ‘ओके. पण रनर म्हणजे काय काय बरं करायचं मी?’
  ‘हा.. हा.. अरे दादा, आमचं क्रि केट तुमच्या नॉर्मल क्रिकेटसारखंच असतं. सगळे नियम सारखेच. फक्त बॉलिंग दोन टप्प्याची असते. फुलटॉस नाही चालत. आणि हो, रन्सचा हिशेब वेगळा असतो. पार्शली ब्लाइंड बॅट्समनला तो करेल तेवढे रन मिळतात. टोटली ब्लाइंडला स्कोअरच्या दुप्पट रन असतात... ’
  ‘पण तुला बॅटिंग करताना बॉल आलेला कसा कळतो?’
  ‘आवाजाच्या अंदाजाने ! बॉलमध्ये बेरिंग्ज असतात. टप्पा झाला की त्यांचा आवाज येतो. प्रत्येक बॉलच्या आधी बॉलर ‘प्ले’ म्हणतो - बॅट्समनला रेडी करायला.’
  ‘आणि बॉलरला विकेट कशी कळते?’
  ‘विकेटमधे बेल्स असतात. किपर आधी बेल वाजवतो - बॉलरला दिशा सांगायला सोप्प असतं रे, तू ग्राउंडवर ये, तुला सगळं कळेल.’
  ‘ओके. ओके. म्हणजे तू शॉट मारलास की मी फक्त पळायचंय. बाकी काही वेगळं काम नाही.’
  ‘अहं, फक्त पळायचं नाहीये. शक्य तेवढे रन्स करायचेत आणि आउट व्हायचं नाहीये. सिलेक्शन झालं तर तुला पार्टी!’
  ‘आणि बँक एंट्रन्स क्लिअर झाल्यावर?’
  ‘डबल पार्टी!!’
   
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS