ऑरेंज लिपस्टिक निळं काजळ

By admin | Published: April 16, 2015 05:20 PM2015-04-16T17:20:41+5:302015-04-16T17:20:41+5:30

उन्हाळा सुरु झाला आणि तमाम तरुणांचे आवडते निऑन कलर्स कपाटात जाऊन बसले! आता हळूच पेस्टल शेड्स बाहेर येतील! पण मेकपचा तुम्ही असा काही खास ‘सिझनल’ विचार केला नसेल तर अजून तरी फॅशन मुरली नाहीये म्हणायची तुमच्या लाईफस्टाईलमधे असं समजा! खरं सांगायचं तर यंदा यंग ट्रेण्ड म्हणून हे समर मेकपचं खूळच जरा जास्त बसलंय अनेक तरुण मनांवर! त्यातलं एकदम हॉट काय? याचीच ही एक झलक.

Orange lipstick blue weed | ऑरेंज लिपस्टिक निळं काजळ

ऑरेंज लिपस्टिक निळं काजळ

Next
>मेकप न करता घराबाहेर पडणा:या चेह:यांवरच्या काही डार्क रंगरेषा
 
 
उन्हाळा सुरु झाला आणि तमाम तरुणांचे आवडते निऑन कलर्स कपाटात जाऊन बसले! आता हळूच पेस्टल शेड्स बाहेर येतील! पण मेकपचा तुम्ही असा काही खास ‘सिझनल’ विचार केला नसेल तर 
अजून तरी फॅशन मुरली नाहीये म्हणायची तुमच्या लाईफस्टाईलमधे असं समजा! खरं सांगायचं तर यंदा यंग ट्रेण्ड म्हणून हे समर मेकपचं खूळच जरा जास्त बसलंय  अनेक तरुण मनांवर! त्यातलं एकदम हॉट काय? याचीच ही एक झलक.
 
 
 
1) ओठावर ऑरेंज लिपस्टिक
म्हणजे ऋतू कुठलाही असो, कपडे कुठलेही असोत, ड्रॉवर उघडून नेहमीचीच लाल किंवा ब्राऊन लिपस्टिक वापरुन कसं चालेल?
या सिझनचा लिपस्टिकचा रंग आहे, ‘ ऑरेंज!’
त्वचेचा टोन कुठलाही असो, रंग कुठलाही असो  ही ऑरेंज लिपस्टिक उन्हाळ्यात एकदम खल्लास दिसते!
त्यात उन्हाळ्यात जेव्हा कपडय़ांचे रंग फिकट होतात, तेव्हा ही एक डार्क शेड सगळा नूरच बदलून टाकते!
सध्या याच इलेक्ट्रिक ऑरेंज लिपस्टिकचे चर्चे आहेत.
 
2) डोळ्याला निळं लायनर
मस्त उन्हाळ्यातली हवेशीर पार्टी आहे, त्यासाठी तुम्हाला जायचंय; किंवा एखादी डेट आहे.
मग मेकप म्हणून नेहमीचंच काहीतरी वापरुन कसं चालेल? 
काळं आयलायनर आणि काजळ तर नेहमीचंच. मॅचिंग आयश्ॉडोही नेहमीचेच!
या उन्हाळ्यातली कातील नजर निळ्या रंगात नटली आहे. निळा आयश्ॉडो आणि निळंच आयलायनर, हे त्या कातील नजरेचे दोस्त रंग! थोडा बोल्डनेस असेल तर स्वत:ला एक वेगळा मॉडर्न लूक या रंगांनी देता येऊ शकतो!
 
3) जाड  शाळकरी आयब्रो
शाळकरी आयब्रो हा शब्द पटकन लक्षात येत नाही. पण आठवा आपले नववी दहावीतले दिवस. त्या वयात कुणी आयब्रो करायला परवानगी देत नसे. त्यामुळे दाट जाडसर वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या आयब्रो असायच्या! तोच ट्रेण्ड आता परत आला आहे. बारीक अतीच कोरलेल्या आयब्रोची फॅशन गेली. दाट-जाडसर आयब्रो आता फॅशनेबल मानल्या जात आहेत. तशा तुमच्या असतील तर फार छान, नसेल तर आय पेन्सिल उचला आणि करा आपल्या आयब्रो जाड-शाळकरी!
 
4) नखांवर ब्लॅकअॅण्डव्हाईट नेलपेण्ट
उन्हाळा म्हटला की तमाम रंग हाताच्या बोटांवर उतरतात.
त्यातलेच काही नखांवर येतात.  आता तर नेलआर्टचा जमाना, नखांवर किती सुंदर नक्षी काढल्या जातात. मात्र या समरमधे फॅशन आहे ती ब्लॅक अॅण्ड व्हाईट नेलपेण्टची. म्हणजे काय तर नखांवर एक पांढ:या नेलपॉलिशचा थर द्यायचा, त्यावर एकच किंवा अनेक काळे बारीक पट्टे काळ्या नेलपेण्टनं काढायचे. किंवा मग नेव्ही ब्ल्यूने काढायचे. अशी नखं या उन्हाळ्यात छान सजताहेत, गाजताहेत!
 
5) रेट्रो डोळे टप्पोरे
 
काळे टप्पोरे डोळे, मोठ्ठालं काजळ, मोठ्ठं आयलायनर, हे सगळं तसं सत्तरच्या दशकातलं!
आता मात्र तोच ट्रेण्ड परत आला आहे. चेह:याला मेकपचा स्पर्शही न करता, अगदी लिपस्टिकही न लावता घराबाहेर पडायचं हा नवा समर ट्रेण्ड. कारण घामाच्या चिकचिकाटात मेकप खराब होतो. मात्र एक गोष्ट करायची. असे रेट्रो स्टाईल डोळे करायचे. म्हणजे मोठ्ठं काजळ, दाट आयलायनर लावायचं! काम फत्ते, ते डोळे अनेकांचा पिच्छा पुरवतात मग!!
-रेहाना मलिक
ब्युटि एक्सपर्ट

Web Title: Orange lipstick blue weed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.