दीवानगीची एक कमाल आणि बेफिक्री धमालही लेडी गागा
By admin | Published: February 8, 2017 02:57 PM2017-02-08T14:57:17+5:302017-02-08T14:57:17+5:30
लेडी गागा हे नाव वाचलं की (आपल्याकडे, आपल्या समाजात सोवळं ओवळंच फार!) दोन प्रतिक्रिया हमखास येतात. पहिला वर्ग, ज्याला लेडी गागाच्या गाण्यांचं कौतुक आहे, त्यातला मॅडनेस कळतो, त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात, त्यांना लेडी गागाविषयी एक आदर आहे.
- निशांत महाजन
लेडी गागा हे नाव वाचलं की (आपल्याकडे, आपल्या समाजात सोवळं ओवळंच फार!) दोन प्रतिक्रिया हमखास येतात. पहिला वर्ग, ज्याला लेडी गागाच्या गाण्यांचं कौतुक आहे, त्यातला मॅडनेस कळतो, त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात, त्यांना लेडी गागाविषयी एक आदर आहे.
दुसरा वर्ग, जो तिच्यावर कायमची फुली मारून बसलेला. अश्लीलतेच्या फुटपट्ट्याच हातात घेऊन उभा..
तर या दोन्हींना काय वाटतं, यापलीकडे लेडी गागानं गेला आठवडा सोशल मीडियात असा काही गाजवला की उर्वरित तमाम ट्रेण्ड्सची दाणादाण झाली. आणि तिचं कौतुक म्हणून हे लिहित नाही, तर त्यामागच्या तरुण दिवानगीची ही दुनियाभरची गोष्ट कशी दिसली ते सांगतो आहे.
तर लेडी गागा सध्या एका ‘हाफटाइम’ नावाच्या इव्हेण्टमध्ये उतरली आहे. स्पर्धाच ती गाण्याची, गायकांची, अल्बम्स आणि फॅशनची. तर त्यात मातब्बर गातात. स्वत:ला पणाला लावतात. लोक डोक्यावर घेतात किंवा भिरकावून देतात. तर त्या स्पर्धेत लेडी गागा जिंकेल अशी काही खात्री नाही..
मात्र तरी तिच्यामागे दुनियाभरचे तरुण पागल झालेत.
ते किती व्हावेत पागल?
तर दर मिनिटाला तिच्या नावानं ४१,००० व्टिट्स केले जात होते. आणि दर मिनिटाला ३९,६०० लोक तिच्याविषयी बोलत होते फेसबुकवर. दर मिनिटाला असं म्हटलं हे ध्यानात घ्या म्हणजे तरुणांची दीवानगी लक्षात घ्या..
आणि ही दीवानगी का?
तर अनेकांना तिच्या गाण्यातला स्वतंत्र, बेभान अप्रोप आवडतो..
दीवाना करतो.
आणि आता तर काय सोशल मीडिया हातात असल्यानं अनेकांची दीवानगी सर चढकर बोलू लागली..