मळीवरून घसरल्याने अपघात १ ठार, ३ जखमी

  • First Published :17-February-2017 : 00:09:08

  • डहाणू : नाशिक राज्यमार्गावर सारणी येथे डहाणूहून कासाकडे जात असतांना शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या सुमोचा रस्त्यावर पसरलेल्या साखरेच्या मळीवरुन घसरुन ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला आणि एक बालिका जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी च्या सुमारास घडली.

    जीपचा चालक नरेश शंकर बुंधे (४०) याचा मृत्यू झाला. तर या वाहनातून प्रवास करणाऱ्या चैती लाहनु बोंड (३०), बनी हिरु करबट (३५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या तर एक बालिका किरकोळ जखमी झाली आहे. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    दरम्यान, याच राज्यमार्गावरून जाणाऱ्या टँकरमधील मळी रस्त्यावर सांडलेल्या मळीवरून घसरुन दोन ते तीन दुचाकीस्वारांचाही अपघात घडला. (वार्ताहर)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS