नेल आर्ट

  • First Published :17-April-2017 : 15:21:02 Last Updated at: 17-April-2017 : 15:45:36

  •  

    हा प्रकार तर आताशा खूप लोकप्रिय आहे. त्यातही निआॅन नेल आर्ट हा तरुण मुलींच्या जगातला एक अत्यंत लेटेस्ट ट्रेण्ड आहे. निआॅन कलर्स नखांवर स्टायलिशली मिरवायला जिगर लागते म्हणतात.

    नखांना नेलपॉलीश लावणं हे किती सहज होतं पुर्वी, कुठल्या तरी आवडीचा रंग चोपडायचा नखांवर झालं काम! आता मात्र जग नेलआर्टच्या विलक्षण जादूई दुनियेत नखांवर अनेकरंगी जादू दिसायला लागली आहे. आणि आता उन्हाळ्यात तर आपल्याला हवे तसे सुखद रंग आपण नखांवर सहज मिरवू शकतो. त्यासाठी आपली कल्पनाशक्ती थोडी वापरली तर फॅशन तयार!

    आता समर निआॅन नेल्स हे त्याच्यापुढचं पाऊल. म्हणजे काय तर बाकी सगळा पोषाख पांढरा, पेस्टल शेड्समध्ये असेल तर हे निआॅन नेल्स सगळा माहौलच रंगील करतात. त्यामुळे एक-दोन-चार निआॅन कलर्स एकत्र वापरुन निआॅन नेलपेण्ट्स लावणं ही या उन्हाळ्यातली सगळ्यात धाडसी कृती म्हणायला हवी.

    नेल आर्टच कशाला हवी, निआॅन कलरच्या नेलपेण्ट काय कुणीही वापरू शकेल.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या