तालवाद्यांची राणी

By admin | Published: March 8, 2016 12:00 AM2016-03-08T00:00:00+5:302016-03-08T00:00:00+5:30

योगिता तांबे.. दृष्टिहिनांबरोबरच दृष्टी असणाऱ्यांसाठीही प्रेरक ठरेल अशी तेजस्विता आहे.

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने योगिता सांगते की दृष्टिहिन असो वा अपंग सर्व व्यक्तींना सर्व साधारण मुलांच्या वातावरणात सामावून घेतले पाहिजे तरच त्यांना मुख्य प्रवाहात स्थान मिळेल.

योगिताला बालपणापासून वाद्यांची आवड होती. आईवडिलांनी तिला वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी तबल्याची शिकवणी लावली. तेव्हापासूनच वाद्य वाजविण्याचा प्रवास अखंड सुरू आहे.

रत्नागिरीत लांजा हे योगिता तांबेचं मूळ गाव. तिथंदेखील पं. बाळासाहेब हिरेमठ यांच्याकडे तिच शिक्षण झालं.

जन्मापासूनच दृष्टिदोष असल्याने दहाव्या वर्षी तिला दादरच्या ‘कमला मेहता अंध शाळे’त घातले. पुढे रुईया कॉलेजमधून तिने इतिहासत बी.ए. व पुढे एम.ए. केले. फर्स्ट क्लास मिळवला.

जोगेश्वरीच्या अस्मिता विद्यालयात योगिता संगीत शिक्षक आहे तिने शाळेत बालवाद्यवृंद बसविला आहे. मूळची लांजाची असलेल्या योगिताचे बालपण मुंबईच्या आजी-आजोबांकडे गेले.

तबला मृदुंग ढोलकी ढोलक धनगरी ढोल ताशा दिमडी हलगी पखवाज नगारा तब्बल २५ प्रकारची तालवाद्ये ती वाजविते आणि आश्चर्य म्हणजे तिची स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे की तिला १५०० दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ आहेत.

ही आहे योगिता तांबे... तिच्याकडे दृष्टी नाही पण त्यावर मात करून तिने वादनकला जपली आहे. ( लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी घेतलेले काही छायाचित्रे पुढे दिले आहेत )

‘ती’...म्हटलं तर जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग. तिच्याच आधारे तर हा सगळा रामरगाडा चालतो. ८ मार्च हा जागतिक महिला दिवस अर्थात ‘ती’ चा दिवस. संपूर्ण देशात नव्हे जगभरात महिलांच्या कार्याला सलाम म्हणून हा दिवस साजरा होतो.