अफगाणमध्ये तालिबान्यांचा हल्ला, 50हून अधिक जणांचा मृत्यू

  • First Published :21-April-2017 : 22:44:39

  • ऑनलाइन लोकमत

    काबूल, दि. 21 - अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान्यांनी बल्क प्रांतातील मजार-ए-शरीफ येथील लष्कराच्या मशिदीवर हा दहशतवादी हल्ला केला असून, अफगाणिस्तानच्या लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र या हल्ल्यात 50 हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार, सहा तालिबानी दहशतवादी लष्कराच्या दोन गाड्यांमधून आले आणि त्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला, अशी माहिती अफगाणिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते नसरतुल्ला जमशिदी यांनी दिली आहे. तालिबान्यांनी रॉकेटच्या साहाय्यानं ग्रेनेड हल्ला केला असून, गोळीबारही करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या लष्करानं त्यातील एका तालिबानी दहशतवाद्याचा खात्मा केला असून, इतर पाच जणांना अटक केली आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या