चीन पाकिस्तानला लागून असलेली सीमा करणार बंद

 • First Published :11-January-2017 : 10:23:41 Last Updated at: 11-January-2017 : 10:50:43

 •  ऑनलाइन लोकमत 

  बिजींग, दि. 11 - दहशतवादाच्या विषयावर पाकिस्तानची तळी उचलणा-या चीनला आता दहशतवादाला पुरस्कृत करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाचे फटके बसू लागले आहेत. शीनजियांग प्रांतातील पाकिस्तानला लागून असलेली सीमा चीन लवकरच बंद करणार आहे. शिनुहा या सरकारी वृत्तसंस्थेने शीनजियांग प्रांताच्या सरकारमधील वरिष्ठांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 
   
  शीनजियांग सीमेवरुन चीनमध्ये होणारा दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी इथल्या सीमेवरील बंदोबस्तात चीनकडून वाढ करण्यात येणार आहे. या वृत्तामधून चीनने स्पष्टपणे पाकिस्तानबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. 
   
  शीनजियांग प्रांतातील दहशतवादी पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतात आणि इथे येऊन हल्ले करतात अशी भिती शीनजियांगमधील कम्युनिस्ट नेत्यांनी व्यक्त केली. चीनच्या शीनजियांग प्रांतात दहशतवादी कारवाया सुरु आहेत. चीन आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मैत्रीची भाषा करत असले तरी, शीनजियांगमधील नेते मात्र पाकिस्तानबरोबरच्या वाढत्या मैत्रीने चिंताग्रस्त आहेत. 
   
महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या