विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

  • First Published :11-January-2017 : 17:41:55

  • ऑनलाइन लोकमत

    डोंबिवली, दि. 11 - येथील एका विद्यार्थिनीने क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
    साक्षी भोसले असे या मुलीचे नाव असून तिच्या आई-वडिलांनी अभ्यासावरुन ओरडल्यामुळे बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास राहत्या घरात फिनाईल प्रशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
    दरम्यान, ती बेशुद्ध पडल्याने घरातील मंडळींनी तिला उपचारासाठी तात्काळ महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. सध्या ती शुद्धीवर आली असून तिची प्रकृती बरी असल्याचे रूग्णालयाच्या  सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करीत असून साक्षी ही एस. के. पाटील शाळेच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समजते.
महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या