माडाची चूक सुधारण्याचे पर्रीकरांचे आश्वासन; सरदेसाई समाधानी

By admin | Published: March 15, 2017 01:32 AM2017-03-15T01:32:57+5:302017-03-15T01:33:09+5:30

पणजी : माडाला भाजप सरकारने गवताचा दर्जा दिला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील

Parrikar's assurance to improve wrongdoing; Sardesai Satisfaction | माडाची चूक सुधारण्याचे पर्रीकरांचे आश्वासन; सरदेसाई समाधानी

माडाची चूक सुधारण्याचे पर्रीकरांचे आश्वासन; सरदेसाई समाधानी

Next

पणजी : माडाला भाजप सरकारने गवताचा दर्जा दिला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर असताना केली होती. नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्या कथित चुकीबाबत सुधारणा करण्याचे आश्वासन मंगळवारी जाहीरपणे दिले. मंत्री विजय सरदेसाई यांनी याबाबत समाधान व्यक्त केले व यापुढील काळात जेव्हा विधानसभेचे पहिले अधिवेशन होईल तेव्हा ती चूक सुधारली जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.
राजभवनवर झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांनी पर्रीकर यांना माडाच्या वादाविषयी प्रश्न विचारला. माडाला गवताचा दर्जा दिला, अशी टीका करून गोवा फॉरवर्डने रान उठविले होते. त्याविषयी बोलताना पर्रीकर म्हणाले, की ती गोष्ट खूप लहान आहे. तथापि, आम्ही त्यात सुधारणा करू व समाधानकारक अशी सुधारणा करू. विश्वासदर्शक ठराव मांडून होऊ द्या, नंतरच्या पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही माडाबाबत कायदेशीर तरतुदीमध्ये सुधारणा करू.
नंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले. सरदेसाई म्हणाले, की आम्ही गोंयकारवादी सरकार चालवू. गोवा फॉरवर्डने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली सगळी आश्वासने पाळली जातील. आपण पर्रीकर यांना पाठिंब्याचा शब्द दिला होता व त्यामुळेच संरक्षणमंत्रिपद सोडून पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले. मी शब्द पाळीन. मी काँग्रेससोबत जाणार नाही; कारण काँग्रेसने निवडणुकीवेळी पाठीत सुरा खुपसला. आमच्याशी निवडणूकपूर्व युती केली नाहीच. शिवाय नंतरही आमच्या विरोधातील उमेदवारांना बी-फॉर्म दिला. आताही काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार खूप आहेत.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Parrikar's assurance to improve wrongdoing; Sardesai Satisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.