४२ वर्षांपासून न झोपलेला माणूस

  • First Published :14-February-2017 : 00:33:02

  • हनोई : चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीर आणि मेंदू ताजातवाना रहातो; परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत जो ४२ वर्षांपासून झोपलेलाच नाही. व्हिएतनामच्या नॉन सोंग येथील रहिवासी नगोक हे गृहस्थ गेल्या ४२ वर्षांपासून जागेच आहेत. १९७३ मध्ये त्यांना ताप आला होता. तेव्हापासून त्यांना झोपच आली नाही. नगोक यांनी डॉक्टरांना दाखविले; मात्र उपचार होऊ शकला नाही. नगोक यांना इनसोम्निया नावाचा आजार झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्री जागण्याचा खूप त्रास होत होता; मात्र आता त्याची सवय झाली आहे. रात्रीचा वेळ घालविण्यासाठी कधीकधी काम करतो, तर कधी चहा घेऊन वेळ काढतो. इनसोम्निया आजारामुळे लोकांना रात्री झोप येत नाही. हा आजार जगातील फार कमी लोकांना होतो.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS