‘मातोश्री’च्या अंगणात नवख्या सुनेची कसोटी

By admin | Published: February 22, 2017 07:32 AM2017-02-22T07:32:50+5:302017-02-22T10:17:43+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीत युती न राहिल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

'Matosree' in the courtyard of the newest hearing | ‘मातोश्री’च्या अंगणात नवख्या सुनेची कसोटी

‘मातोश्री’च्या अंगणात नवख्या सुनेची कसोटी

Next

सुशांत मोरे / मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत युती न राहिल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दादर, लालबाग बरोबरच वर्चस्व असलेल्या वांद्रे पूर्वमध्येही शिवसेनेचे विशेष लक्ष लागून आहे. प्रभाग ९३ हा अनुसूचित जाती (महिला) आरक्षित झाल्याने येथे उमेदवार उभे करताना सेनेची धांदल उडाली. सेनेने नवखा उमेदवार उभा केला़ भाजपने पाठिंबा दिलेल्या आरपीआयनेही उमेदवार उभा केला़ या उमेदवाराने प्रचारात मुसंडी मारल्याने येथे चांगलीच स्पर्धा निर्माण झाली. गेल्या पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहे़ तर नगरसेवकाची दुसरी टर्म असणारा उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसमुळेही चुरस वाढली आहे.
वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा गड मानला जातो. २०१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे अनिल त्रिंबक्कर हे विजयी झाले होते. त्यांना ५ हजार ८३८ मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमाकांची म्हणजेच ५ हजार ४२७ एवढी मते मिळाली. मनसेने साडे तीन हजारपेक्षा तर शिवसेनेतून फुटून अपक्ष उमेदवार उभे राहिलेल्या सुहास पाटील यांनी ३ हजाराच्या वर मते मिळवली.
यंदा युती नसल्याने शिवसेना, भाजपने तर आघाडी नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. उमेदवार उभे करताना शिवसेनेकडून पूर्णत: नवखा उमेदवार उभा करण्यात आला. अनुसूचित जातीसाठी आरक्षित (महिला) असणाऱ्या या विभागात रोहिणी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. गृहिणी असणाऱ्या रोहिणी कांबळे या टीचर्स कॉलनीमध्ये राहतात. नवखा उमेदवार उभा करण्यात आल्याने ही सीट काढण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रचारासाठी उतरवण्यात आले.
महत्वाची बाब म्हणजे स्वत:चा गड असताना आणि नवखा उमेदवार असतानाही या परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे सभाही घेतली नाही. परिणामी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच धाकधूक वाढली आहे.
गेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९० मधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या नगरसेविका प्रियतमा सावंत यांनाही काँग्रेसने शिवसेनेच्या गडातच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने कामिनी जाधव आणि मनसेकडून नंदा आयकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपाने रचले डावपेच

च्शिवसेनेला यंदा याच परिसरात पराभूत करण्यासाठी भाजपनेही चांगलेच डावपेच रचले. एमआयजीत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली़ रामदास आठवले यांच्यासह आरपीआय व भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रचारात उतरले.

च्शिवसेनेने तरुण व नवखा उमेदवार उभा केला असतानाच आरपीआयनेही अवघे ३१ वय असलेल्या आणि कोणताही पालिका निवडणुकीचा अनुभव नसलेला उमेदवार उभा केला. त्यामुळे आरपीआय आणि भाजपकडून चांगलीच स्पर्धा निर्माण झाली.

Web Title: 'Matosree' in the courtyard of the newest hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.