सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करा-राबिया खान

  • First Published :21-April-2017 : 03:39:35

  • मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात यावे, यासाठी जियाची आई राबिया खानने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला. सूरजने जियाची हत्या केल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत, असे तिने अर्जात म्हटले आहे.

    जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. मात्र सूरजने आपल्या मुलीची हत्या केल्याचे म्हणत याप्रकरणाचा वर्ग विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) वर्ग करावा, यासाठी राबियाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने राबियाची ही याचिका निकाली काढत एसआयटी नेमण्यास मनाई केली. सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची सर्व दृष्टिकोनातून चौकशी केली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या तपास यंत्रणेने तपास करणे व्यर्थ ठरेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढताना नोंदवले होते.

    राबियाने सीबीआयच्या तपास अनेक त्रुटी असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले होते. याप्रकरणी एफबीआयला मध्यस्थी करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही तिने मागणी केली होती. (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या