मशिदींवरील भोंग्यांविरोधात सोनू निगमचा बिगुल

 • First Published :17-April-2017 : 09:45:15 Last Updated at: 17-April-2017 : 14:34:51

 •  ऑनलाइन लोकमत

  मुंबई, दि. 17 - सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवला आहे.  'मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबवणार?', असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. 
   
  दरम्यान सोनने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
   
  शिवाय, 'मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लाम धर्माची सुरुवात केली. त्याकाळी वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?', असाही प्रश्न  सोनूनं विचारला आहे. 
   
  'जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही', असेदेखील ट्विट सोनूनं केले आहे.  
   
  सोनू निगमचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
  दरम्यान, मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
   
  तर दुसरीकडे यासंदर्भात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारन मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय कधी घेणार?, असा सवाल सामना संपादकीयमधून उपस्थित केला होता. मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध लाखो तक्रारी गेल्या अनेक वर्षांत सरकारदफ्तरी दाखल झाल्या आणि धूळ खात पडल्या आहेत. त्यावर निर्णय कधी होणार असा सवाल त्यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केलो हाता. अग्रलेखातून उपस्थित केला होता. 


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS