'उडता पंजाब' लीक झाल्याप्रकरणी एकाला अटक

  • First Published :22-June-2016 : 22:19:01

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २२ - 'उडता पंजाब' चित्रपट  लीक झाल्याप्रकरणी दिल्लीहून एकाला अटक करण्यात आली आहे. दीपक कुमार असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
    मुंबईच्या सायबर सेलच्या टीमने दीपक कुमारला अटक केली असून त्याने 'उडता पंजाब' चित्रपटची लीक झालेली कॉपी इंटरनेटवर अपलोड केली होती.
     'उडता पंजाब' चित्रपटातून पंजाब, राजकारण आणि निवडणुकीबद्दलचे संदर्भ काढून टाकण्यास सांगितले होते. यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी  'उडता पंजाब' आणि सेन्सॉर बोर्ड असा वाद रंगला होता. 


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS