दोन दिवसांपासून बिबट्या विहिरीत

  • First Published :09-January-2017 : 04:34:36

  • राहुरी (अहमदनगर) :खडांबे येथील विहिरीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला दुसऱ्या दिवशीही अपयश आले. रविवारी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला, मात्र बिबट्या पिंजऱ्यात न येता विहिरीतील कपारीत दडून बसला.

    खडांबे बुद्रुकयेथे बाबासाहेब ताकटे यांची विहीर आहे. त्यांनी विहिरीत मत्स्यपालन केले असून शनिवारी संध्याकाळी ताकटे यांना विहिरीच्या कपारीत बिबट्या आढळून आला. ही माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी वन विभागाचा चमू घटनास्थळी पोहोचला. अनेक प्रयत्न करूनही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बिबट्या बाहेर निघाला नव्हता. दरम्यान, येथीलचसुरेश ताकटे यांचा कुत्रा बिबट्याने फस्त केला असूनताकटे यांच्या शेतावरही वन विभागाने एक पिंजरा लावला आहे़ (प्रतिनिधी)

vastushastra
aadhyatma