बँकेच्या रांगेत एकाचा मृत्यू

  • First Published :26-December-2016 : 22:01:22

  • ऑनलाइन लोकमत

    रावेर/खिर्डी, दि. 26 - खिर्डी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक अय्यूब बेग रशीद बेग (वय ६८) हे सोमवारी सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता रांगेतच चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाला़

    अय्यूब बेग हे मुलगा अनीश बेग सोबत असल्यामुळे पैसे काढण्यासाठी सोमवारी सकाळी बँकेत गेले होते मात्र गर्दी असल्याने रांगेत उभे असतानाच ते चक्कर येवून खाली कोसळले़ सुरुवातीला निभोरा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून सावदा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुले आहेत़

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या