साईनगरी फुलली!

  • First Published :26-December-2016 : 04:25:31

  • शिर्डी : नाताळ व वर्षअखेरनिमित्त शिर्डीत दरवर्षीप्रमाणे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे़ शनिवार व रविवारी सुमारे सव्वा लाख भाविकांनी साईदर्शन घेतले.

    यंदा नाताळात प्रथमच टाइम दर्शनामुळे रांगा शहराबाहेर गेल्या नाहीत़ भाविकांना झटपट कार्ड मिळत आहेत़ मात्र गर्दीमुळे अनेकांनी मुखदर्शनावरच समाधान मानले़ २४ डिसेंबरला मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते़

    मध्यरात्रीपर्यंत ५७,५२७ भाविकांनी, तर मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५,६५५ भाविकांनी दर्शन घेतले. पंधरा हजार भाविकांनी सशुल्क दर्शन व आरतीचा लाभ घेतला़ संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ३१ डिसेंबरलाही मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS