...त्या तीन खेळाडूंना ‘क्लीनचिट’

By admin | Published: June 30, 2015 02:13 AM2015-06-30T02:13:59+5:302015-06-30T02:13:59+5:30

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लाचखोरीचा आरोप केलेल्या त्या तीन क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आज क्लीनचिट दिली.

... the three cleaners 'clean chit' | ...त्या तीन खेळाडूंना ‘क्लीनचिट’

...त्या तीन खेळाडूंना ‘क्लीनचिट’

Next

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लाचखोरीचा आरोप केलेल्या त्या तीन क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आज क्लीनचिट दिली. मोदी यांनी त्या तीन क्रिकेटपटूंनी मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडून लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता.
ललित मोदी यांनी जून २०१३ मध्ये आयसीसीला पाठविलेल्या पत्राबाबत विचारले असता, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले,‘‘यात काही तथ्य नाही.’’ या पत्रात मोदी यांनी दावा केला आहे, की भारताचे २ व वेस्ट इंडीजच्या एका क्रिकेटपटूला प्रत्येकी २० कोटी रुपये प्रदान करण्यात आले होते.’’
ठाकूर म्हणाले, ‘‘ललित मोदी यांनी आयसीसीला पत्र लिहिले. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयला या पत्राबाबत माहिती दिली. हे तिन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. आयसीसीकडून अद्याप या खेळाडूंबाबत कुठलीच सूचना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना खेळण्यास क्लीनचिट देण्यात आलेली आहे. आयसीसीने प्रसिद्धीसाठी पत्रक दिले आहे. त्यात बीसीसीआयला तीन खेळाडूंबाबत सूचना दिली. केवळ आयसीसीच यावर उत्तर देऊ शकते. हे प्रकरण आयसीसीच्या अधिकारक्षेत्रात येते. आयसीसीने स्पष्ट केले, की चौकशी सुरू आहे. उत्तर देण्याचा अधिकार केवळ आयसीसीला आहे. काही घडले तर ते आम्हाला आणखी माहिती देतील. ललित मोदी यांचे पत्र मिळाल्याची सूचना आयसीसीकडून रविवारी मिळाली. आयसीसीने स्पष्ट केले, की ललित मोदी यांच्याकडून २०१३मध्ये आम्हाला मेल मिळाला होता. आम्ही हा मेल एसीएसयूला पाठविला. एसीएसयूने यावर कारवाई केली.
(वृत्तसंस्था)

Web Title: ... the three cleaners 'clean chit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.