सोलापूरात जुगार आडयांवर धाड, ८ जण ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: April 4, 2017 02:26 PM2017-04-04T14:26:49+5:302017-04-04T14:26:49+5:30

.

Soldiers held gambling, 8 people arrested | सोलापूरात जुगार आडयांवर धाड, ८ जण ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरात जुगार आडयांवर धाड, ८ जण ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे मन्ना नावाचा जुगार आड्यांवर धाड टाकून ८ जणांना ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून १ लाख ८६ हजार ६५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली़
कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे जुगार चालत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने कोंडी येथील पुलाखाली आयुब बागवान यांच्या जुगार आड्यांवर छापा टाकला़ यावेळी उमेश धोंडीबा सुरटे (वय ४८ बुधवार पेठ, सोलापूर), सैफ रईम भंडाले (वय ४४, बेगमपेठ,सोलापूर), गजानन सजाराम पवार (वय ४५ कौतम चौक, सोलापूर), रियाज बंदेनवाज मुलाण (वय ३४ सात रस्ता, सोलापूर), इकबाल हुसेनसाब बागवान (वय ५२ बेगमपेठ), रवी चंद्रकांत गुमटे (वय ५६), शिवाजी बाबु राठोड (वय ३५ रा़ कोंडी), आयुब आमीरसाहब बागवान (वय ५६ रा़ कोंडी) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून मोबाईल हॅन्डसेट, पत्याचा डाव, जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ८६ हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी पोहेकॉ सर्जेराव बोबडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक एस विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहा़ पोलीस निरीक्षक उमेश धुमाळ, पोसई रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पांडूरंग लांडगे, सचिन वाकडे, सर्जेराव बोबडे, संभाजी खरटमल, पोकॉ आसिफ शेख, सागर शिंदे, सचिन मागाडे, समीर खैरे, विजय भरले, संभाजी खरटमल, ईस्माईल शेख, दिपक जाधव यांनी बजावली आहे़

Web Title: Soldiers held gambling, 8 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.