पोलीस ठाण्यांना आवश्यक सुविधा देणार

By admin | Published: April 21, 2017 12:03 AM2017-04-21T00:03:32+5:302017-04-21T00:03:32+5:30

मीरा-भार्इंदरमध्ये सध्या एकूण सहा पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात सुविधांचा अभाव आहे. याचा आढावा घेण्यासाठी थेट पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते

Provide necessary facilities to the police station | पोलीस ठाण्यांना आवश्यक सुविधा देणार

पोलीस ठाण्यांना आवश्यक सुविधा देणार

Next

राजू काळे , भाईंदर
मीरा-भार्इंदरमध्ये सध्या एकूण सहा पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात सुविधांचा अभाव आहे. याचा आढावा घेण्यासाठी थेट पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यावेळी निदर्शनास येणाऱ्या समस्या सोडविणे तसेच आवश्यक सुविधा पालिकेमार्फत पुरविल्या जातील, अशी माहिती आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पोलिसांचे मनोधैर्य वाढविल्यास त्यांचे कार्यही तितकेच चांगले होते. त्यात एखादा कर्मचारी वा अधिकाऱ्याचा उर्मटपणा इतर पोलिसांच्या कार्यात विघ्न आणण्यास जबाबदार ठरतो. तरी देखील पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करीत नाही.
कधीकधी पोलीस ठाण्यातील सुविधांअभावी पोलिसांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. चांगल्या सुविधा त्यांना मिळाल्यास त्यांची कार्यतत्परता वाढते. या अनुषंगाने राज्याच्या गृहविभागासह मीरा-भार्इंदर महापालिकेकडून स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखेला साहित्यांचा पुरवठा केला जातो. प्रसंगी वाहतूक शाखेला मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सुमारे ५० वाहतूक मदतनीसही पालिकेने दिले आहेत.
नो पार्कींग झोनमधील चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी आवश्यक साहित्यांसह शहरातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तजवीज, ध्वनी प्रदूषण यंत्रे आदी साहित्यही पोलिसांच्या दिमतीला पालिकेकडून पुरविली जातात, असेही गीते यांनी सांगितले.
स्थानिक पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक लूक देण्यासाठी अद्याप गृहविभागाकडून हालचाल झाली नसली तरी त्याचे प्रयत्न मात्र नक्कीच केले जात असल्याचे सतत सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाणी पालिकेच्या मदतीच्या अपेक्षेवर असली तरी त्यासाठी राज्य सरकारकडूनही पालिकेला वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत.
अनेक वर्षापासून पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न रेंगाळला आहे. त्यासाठी मीरा रोड येथील भूखंड पोलिसांच्या हाती लागला नसला तरी पालिकेने आयुक्तालयासाठी पुरेशी जागा देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Provide necessary facilities to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.