पुण्यात नीचांकी तापमान

  • First Published :12-January-2017 : 02:22:30

  • पुणे : संक्रांतीच्या तोंडावर थंडीचा कडाका आणखी वाढला असून मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ पुण्यात हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान ७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ त्यात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

    राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ५़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे़ विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची घट झाली आहे़ देशभरात थंडीचा कडाका वाढला असून पश्चिम राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब येथे थंडीची लाट दिसून येत आहे़ हरियाना, पश्चिम राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा शुन्याच्या खाली गेला असून पंजाब व राजस्थानात काही ठिकाणी किमान तापमान २ अशांच्या खाली गेले आहे़ पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी या हंगामातील सर्वात कमी ७़८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती़ बुधवारी सकाळी त्यात आणखी घट होऊन ७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS