मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला आजन्म कारावास

  • First Published :12-January-2017 : 02:21:42

  • पुणे : आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केल्याबद्दल बापाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी हा निकाल दिला़

    ही घटना चाईल्डलाईन संस्थेच्या मदतीने उघडकीस आली होती़ ही १६ वर्षांची मुलगी हडपसर येथे राहत असून नववीत शिकत होती़ या मुलीने २३ सप्टेंबर २०१४ रोजी या हेल्पलाईनवर शाळेतून फोन करून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली़ संस्थेच्या सविता दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांच्या संमतीने या मुलीची भेट घेतली़ तिने सांगितलेली हकीकत त्यांनी पोलिसांना कळविली़महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS