बालकलाकारांच्या चित्राने रसिक भारावले

By admin | Published: January 30, 2015 01:33 AM2015-01-30T01:33:07+5:302015-01-30T01:33:07+5:30

जन्मापासून अपंग असलेला विद्यार्थी पण आपल्या कलाकारितीतून सर्वांना प्रभावित करणा-या जयेश शिंगाडे या आदिवासी बालकाने

Child artist filled with gratitude | बालकलाकारांच्या चित्राने रसिक भारावले

बालकलाकारांच्या चित्राने रसिक भारावले

Next

कर्जत : जन्मापासून अपंग असलेला विद्यार्थी पण आपल्या कलाकारितीतून सर्वांना प्रभावित करणा-या जयेश शिंगाडे या आदिवासी बालकाने नेरळ मधील एका स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते बालाजी फाऊंडेशनच्या चित्र प्रदर्शनाचे.
नेरळमधील साने सभागृह येथे शालेय विद्यार्थी यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जेष्ठ चित्रकला शिक्षक जी बी पाटील, कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अंकुश मोरे, तसेच पप्पू गांधी, संजय शिंदे, सारंग, विवेक दहिवलीकर आदि उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला शिक्षक दीक्षति यांनी भूमिका बाजवली.
स्पर्धेत पहिली ते दुसरीच्या गटातून राज गणेश जाधव-प्रथम, हर्ष दिनेश सहारे-दूसरा, वेदिका अशोक गायकर-तिसरा यांनी क्रमांक पटकाविला. इयता तीसरी ते चौथी या गट मध्ये हर्षदा संतोष देवरस-प्रथम, हर्ष रवि जाधव-दूसरा,रितिका
राजेंद्र घारे-तिसरी यांनी क्र मांक पटकावले.
इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटामध्ये यश रामदास-प्रथम,आशुतोष साठे-दूसरा, तेजस सोमनाथ सानप-तिसरा आणि जयेश तुकाराम शिंगाडे-उत्तेजनार्थ असे क्र मांक जाहिर करण्यात आले.
इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामध्ये सोहम जाधव-प्रथम, दिनेश वामन चौधरी-दूसरा आणि हर्शल दिहविलकर यांनी आपल्या आकर्षक चित्रन्नी क्र मांक पटकावले. यात विशेष म्हणजे माणगाववाडी आश्रम शाळेतील इयत्ता सातवीतील जयेश शिंगाडे याला जन्मत:च दोन्ही हात नसूनही त्याने यश मिळविले.

Web Title: Child artist filled with gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.