चेन्नईतल्या तरुणांची स्वच्छता आर्मी

By admin | Published: June 25, 2015 02:35 PM2015-06-25T14:35:48+5:302015-06-25T14:35:48+5:30

चेन्नई ट्रेकिंग क्लब म्हणजे सीसीसी. दक्षिण भारतातला हा नावाजलेला ट्रेकिंग क्लब. चार ट्रेकर्स मित्रंनी सुरू केला आणि आज त्याचे 25 हजारांहून अधिक सदस्य आहेत. आणि ते सारे एखाद्या सैन्यासारखे प्लॅस्टिकच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

Cleanliness Army of the youth of Chennai | चेन्नईतल्या तरुणांची स्वच्छता आर्मी

चेन्नईतल्या तरुणांची स्वच्छता आर्मी

Next
>दर रविवारी समुद्रकिनारे स्वच्छ करून काही टन कचरा गोळा करणारे तरुण दोस्त.
 
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानंतरच्या एका रविवारची ही गोष्ट.
7 जूनच्या रविवारी चेन्नईतली मरीना ते पाँडिचेरीर्पयतची किनारपट्टी गजबजून गेली होती. सकाळीच पाच वाजल्यापासून ग्रुप-ग्रुपने छोटय़ांपासून मोठय़ांर्पयत सारेजण बीचवर हजर होत होते. बघता बघता त्यांची संख्या शे- दोनशेवरून हजारांवर पोहचली.  सहाच्या सुमारास प्रत्येकाला एकेक गारबेज बॅग दिली गेली. सगळ्यांनी हातमोजे घातले. त्यांच्या टीम लीडर्सनी त्यांचे वेगवेगळे गट केले. प्रत्येक गटाने 2क्-2क् किमी लांब किनारपट्टी स्वच्छ करायची. काही सूचना दिल्या आणि झटाझट ही मंडळी कामाला लागली. हातातल्या बॅग्जमध्ये किना:यालगतचा कचरा गोळा करू लागली. वाळूतल्या, झाडाझुडपांमधल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, वेष्टन, कार्ड बोर्ड, फिशिंग नेट, सँडल्स, रबरी उशा, फुटलेल्या दारूच्या बाटल्या आणि आणखीनही बरंच काही. तीन तासांच्या अवधीत या मंडळींनी तब्बल 29 टन कचरा जमा केला!
चेन्नईतल्या प्रत्येक पर्यावरणप्रेमीची महिन्यातल्या  एखाददुस:या रविवारची सकाळ ही अशीच असते. 
त्यांना एकत्र आणलं कोणी?
चेन्नई ट्रेकिंग क्लब(सीसीसी). दक्षिण भारतातला हा नावाजलेला ट्रेकिंग क्लब. पीटर गेट, सिवाकुमार, प्रभाकर एम, विनोध या चौघांनी सीसीसी 2क्क्8 मध्ये सुरू केलं. ही चौघंही निसर्गप्रेमी. ट्रेकिंग त्यांचा आवडता छंद. हा क्लब सुरू झाला तेव्हा मोजून दहा ते पंधराजण या क्लबचे सदस्य होते. तेही त्यांचे नेहमीचे पंटर. 
पण फक्त ट्रेकिंग नको, निसर्गरक्षण, निसर्गाबद्दल प्रेमही लोकांना वाटलं पाहिजे, त्यांना निसर्ग वाचता आला पाहिजे, अनुभवता यायला हवा याकरता ही चौघं ट्रेकिंगदरम्यान पर्यावरण क्षेत्रतल्या जाणकार मंडळींना ट्रेकर्सना माहिती देण्यासाठी बोलावू लागली. शिवाय सुरुवातीपासूनच जिथे जाऊ तिथे स्वच्छता करू, स्वच्छता ठेवू हा त्यांचा फंडा त्यांच्यासह जाणा:या प्रत्येकाला भावू लागला. त्यामुळे अनेक माणसं या क्लबमध्ये जोडली गेली. आज या क्लबचे 25 हजारांहून अधिक सदस्य आहेत; शिवाय दर महिन्याला त्यांच्या सीसीसीमध्ये 5क्क् जणांची भर पडतेच. 
क्लीनअप ड्राइव्हसाठी रविवारच का?
आपल्याकडे रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस. असं असताना, क्लीनअप ड्राइव्हसाठी रविवारच का निवडला, या प्रश्नावर पीटर उत्तर देतो, ‘‘सुट्टी, आराम हे सगळं खरं असलं, तरी हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी लोक ऑफिसला, शाळा-कॉलेजात वेळेत पोहचायचंय म्हणणार नव्हते; शिवाय सकाळी फक्त तीन तासच लोकांना द्यावे लागणार होते. त्यानंतर ते आपलं काम करण्यास मोकळे होतात. मूव्ही, शॉपिंग, नातेवाइकांच्या भेटीगाठी हे सारं त्यानंतर सुरळीत होणारच होतं. सीसीसीच्या सदस्यांनी रविवारची कल्पना उचलून धरली; शिवाय सोबत आपल्या इतर परिचितांना आणण्याचं आपणहून कबूल केलं. या ड्राइव्हसाठी सकाळची पाचची वेळ दिली जाते. सगळे जमेर्पयत, त्यांना सूचना देईपर्यंत सहा वाजतात. त्यानंतर स्वच्छता अभियानाला सुरुवात होते. तीन तास ही मोहीम सुरू राहते. 
आता तर कित्येकजण आम्हाला, आम्ही दैनंदिन जीवनातून प्लॅस्टिकचा वापर हद्दपार केल्याचं सांगतात. घरच्याघरी ओला-सुका कचरा वेगळा करत असल्याचं सांगतात, तेव्हा आमच्या मोहिमेचं चीज होत असल्याचं समाधान आम्हाला मिळतं. आमची मोहीम योग्य दिशेनं सुरू असल्याची खात्री आम्हाला पटते.   
यंदा प्रथमच आमच्या मोहिमेत चेन्नई प्रशासनही सहभागी झालं होतं. त्यांनी आम्हाला गारबेज रेक्स दिले. तसंच कचरा वाहून नेण्यासाठी लॉरी/ट्रकही दिले. चेन्नईतून दर दिवसाला सहा हजार 6क्क् टन कचरा डम्प करण्यासाठी जातो; मात्र या डम्पिंगमुळे पक्ष्याप्राण्यांचा हा अधिवास संकटात आलाय. कच:याच्या समस्येवर तसेच किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही चेन्नई प्रशासनासह काम करत आहोत.’’
या प्लॅस्टिकचं करतात काय?
सीसीसीचा सिवा म्हणाला, ‘‘या मोहिमेंतर्गत जमा होणारं प्लॅस्टिक रिसायकल करणा:या संस्था-कंपन्यांकडे दिलं जातं. पण काही पातळ प्लॅस्टिक त्यातील मायक्रॉन आणि अल्युमिनिअममुळे रिसायकल करता येत नाही. (जसे लेज, बिस्किटची पाकिटं.) परंतु त्याचा वापर टार रोड्स बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
आमच्या सीसीसी-4 मोहिमेंतर्गत आम्ही अडीच टन पातळ प्लॅस्टिक जमा केलं होतं. ते आम्ही मदम्बक्कम पंचायतीकडे दिलं. हे प्लॅस्टिक मशीनद्वारे स्वच्छ करून सुकवण्यात आलं. त्याचे छोटे छोटे तुकडे करून टारमध्ये मिसळलं गेलं. या मिश्रणापासून रस्ते बनवण्यात आले. या रस्त्यांना आता दोन र्वष झालीत पण ते अजूनही सुस्थितीत आहेत. त्यावर एकही खड्डा नाही.’’
प्लॅस्टिकविरुद्ध लढणारी एक आर्मीच ही मुलं आता अशाप्रकारे तयार करत आहेत.

Web Title: Cleanliness Army of the youth of Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.