नववीपासून व्यावसायिक शिक्षण

By admin | Published: August 22, 2014 02:13 AM2014-08-22T02:13:26+5:302014-08-22T02:13:26+5:30

विद्याथ्र्यामध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात यापुढे इयत्ता नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

Business education from ninth grade | नववीपासून व्यावसायिक शिक्षण

नववीपासून व्यावसायिक शिक्षण

Next
शिक्षणमंत्र्यांची घोषणा : पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षण 
 
मुंबई : विद्याथ्र्यामध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात यापुढे इयत्ता नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात  येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्याना पॉलिटेक्निक, आयटीआय आणि द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज केली. 
व्यावसायिक शिक्षण विषयाला अभ्यासक्रमातील इतर विषयांप्रमाणोच महत्त्व राहणार असून, केंद्र सरकारचे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, केंद्रीय व्यवसाय शिक्षण संस्था; भोपाळ व राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने निर्धारित केलेला हा दज्रेदार अभ्यासक्रम असेल. या माध्यमातून नियमित शिक्षणाबरोबरच विद्याथ्र्याना आता व्यावसायिक शिक्षण मिळेल, असे शिक्षणमंत्री दर्डा यांनी सांगितले.
इयत्ता नववीपासून शासकीय व खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला राज्यातील 35क् शासकीय माध्यमिक शाळांना योजनेचा लाभ मिळेल, त्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसाहाय्य लाभणार आहे. खासगी संस्थांना सदर अभ्यासक्रम स्वबळावर सुरू करता येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक व्यवसाय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एनएसक्यूएफ कक्ष स्थापन केला जाईल, अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
व्यवसाय शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना असे आरक्षण मिळेल
च्शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 टक्के आरक्षण.
च्शासकीय व अशासकीय तंत्रनिकेतनांमध्ये 15 टक्के आरक्षण.
च्उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये 
25 टक्के आरक्षण.
च्द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये 
25 टक्के आरक्षण.
 
1सध्याच्या गुणपद्धतीत द्वितीय अथवा तृतीय भाषेऐवजी शंभर गुणांच्या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील एक विषय निवडण्याची विद्याथ्र्याना इयत्ता नववीपासून मुभा असेल.
 
2इयत्ता दहावीमधील व्यवसाय शिक्षण या विषयाचे गुण 6क्क् गुणांच्या सरासरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
3शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परस्पर समन्वयातून ही योजना राबविली जाणार आहे.  
4केंद्र सरकारच्या एनएसक्यूएफ अथवा राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम विद्याथ्र्याना निवडता येणार.

 

Web Title: Business education from ninth grade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.