बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं अव्वल

By admin | Published: May 27, 2015 11:44 AM2015-05-27T11:44:11+5:302015-05-27T13:24:51+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला असून ९५.६८टक्के निकालासह कोकणने बाजी मारली आहे.

HC results declared, Konkan decides the best | बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं अव्वल

बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं अव्वल

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २७ -  राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९५.६८ टक्के) लागला आहे.  तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (८८.१३ टक्के) लागला आहे. 

यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली असून ९४.२९ टक्के विद्यार्थीनी तर ८८.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला.

विभागवार निकाल खालील प्रमाणे आहेत :

कोकण - ९५.६८ टक्के

पुणे  - ९१.९६ टक्के

कोल्हापूर - ९२.१३ टक्के

मुंबई - ९०.११ टक्के

औरंगाबाद - ९१.७७ टक्के

लातूर - ९१.९३ टक्के

अमरावती - ९२.५० टक्के

यवतमाळ - ९२ टक्के

नागपूर - ९२.११ टक्के

नाशित ८८.१३ टक्के 

 

शाखांनुसार टक्केवारी खालीलप्रमाणे : 

विज्ञान : ९५.७२ टक्के

वाणिज्य : ९१.६० टक्के

कला : ८६.३१ टक्के 

एमसीव्हीसी : ८९.३०

दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. तर गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींचे वाटप ४ जून रोजी दुपारी ३ वाजता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. 

या संकेतस्थळांवर बघता येईल निकाल: 

www.maharesult.nic.in  
 www.maharashtraeducation.com  
 www.hscresult.mkcl.org  
 www.rediff.com/exams  

Web Title: HC results declared, Konkan decides the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.