रेल्वे भरतीला स्थगिती

By admin | Published: August 27, 2014 03:21 PM2014-08-27T15:21:04+5:302014-08-27T15:21:04+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी भरावयाच्या पॅरामेडिकल पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई ट्रिब्युनल (मॅट)ने स्थगिती दिली.

Suspension of Railway Recruitment | रेल्वे भरतीला स्थगिती

रेल्वे भरतीला स्थगिती

Next

भुसावळ : मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागासाठी (वैद्यकीय व्यवसायाला पूरक कार्य करणार्‍या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानासारखी व्यक्ती) भरावयाच्या पॅरामेडिकल पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई ट्रिब्युनल (मॅट)ने स्थगिती दिली. त्यामुळे आज प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. नोकरीच्या आशेने आलेल्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डी.एस. लोकरे यांनी बाहेरून आलेल्या उमेदवारांना रेल्वे नोकर भरती प्रक्रियेतील कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यामुळे उमेदवारांचे समाधान झाले व त्यांनी परतीचा रस्ता धरला.
याबाबतची माहिती अशी की, भुसावळ रेल्वे विभागासाठी (रेल्वे रुग्णालय) आज कॉण्ट्रॅक्ट पद्धतीने सी श्रेणीसाठी आरोग्य निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट रेडिओग्राफर आणि डायटेशन पदासाठी मुलाखती होणार होत्या. मात्र रेल्वेतील या नोकर भरतीला कॅटने (सेंट्रल ट्रिब्युनल) आठ दिवसांपूर्वीच स्थगिती दिली आहे.
दरम्यान, नोकर भरतीला स्थगिती मिळताच भुसावळ रेल्वे विभागाच्या कार्मिक शाखेने याची तत्काळ दखल घेऊन आणि नियोजित २६ ऑगस्ट रोजी होणार्‍या मुलाखतीला उमेदवारांना माहिती व्हावी म्हणून वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे सूचित केले. मात्र ज्यांच्या वाचण्यात याबाबतची जाहिरात आली नाही अशा अनेक उमेदवारांनी आज डीआरएम कार्यालयात सकाळी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. 
सुरुवातीला त्यांना नीट माहिती देण्यात आली नाही. शिवाय त्यांना प्रवेश देण्यात आला नसल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
मात्र सकाळी ९.३0 वाजता वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डी. एस. लोकरे कार्यालयात येताच त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना सर्व बाब समजावून सांगितली. त्यामुळे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचे समाधान झाले व त्यांनी घरचा रस्ता धरला, असे लोकरे यांनी सांगितले.
 

Web Title: Suspension of Railway Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.