ई-मेल हॅक करून बायकोचे बँक स्टेटमेंट चोरले

  • First Published :17-February-2017 : 02:08:11

  • कल्याण : पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, यासाठी तिचा ई-मेल आयडी हॅक करून बँक स्टेटमेंट न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पतीविरुद्ध कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या विवाहितेने पतीविरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तिचा पती जयप्रकाश कोंडये (रा. बोरिवली) याने २१ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पत्नीचा ई-मेल आयडी हॅक करून तिचे आयसीआयसीआय बँकेचे स्टेटमेंट चोरले. तिला पोटगी द्यावी लागू नये, यासाठी त्याने ते न्यायालयात सादर केले. याप्रकरणी पत्नीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद नोंदवली. त्यानुसार, कोंडये विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma