आघाडी सरकारने नाफेडचे वाटोळे केले

By admin | Published: September 19, 2014 11:00 PM2014-09-19T23:00:44+5:302014-09-20T00:38:53+5:30

- गेहलोत यांचा आरोप

The alliance government defeated Nafed | आघाडी सरकारने नाफेडचे वाटोळे केले

आघाडी सरकारने नाफेडचे वाटोळे केले

Next

सटाणा : माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच कांदानिर्यात करणाऱ्या नाफेड संस्थेवर पवार यांच्या मर्जीतील लोकांची नेमणूक असल्यामुळेच कांदा भावाचा गोंधळ सुरू असून, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. पवार यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम ‘पुतना मावशी’सारखे असल्याची टीकाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी येथे केली.
भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राज्याच्या आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे शेती मालाला योग्य भाव मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम पवार यांनी केले.आघाडी सरकारने घोटाळे करत देश रसातळाला नेल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. या प्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार उमाजी बोरसे, आमदार अपूर्व हिरे, विकास देशमुख,संघटन मंत्री संजय कोडगे,नितीन वानखेडे किशोर भामरे, मुन्ना सोनवणे, साहेबराव सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. संजय पाटील, डॉ. प्रशांत पाटीलआदी उपस्थित होते.

Web Title: The alliance government defeated Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.